गुहागर, ता. 08 : जि.प.रत्नागिरीच्या कृषी विभागाच्या हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील जानवळे, रानवी व आबलोली येथे लागवड केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -4) हळद लागवडीच्या प्लॉटला डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भेट दिली. Konkan Agricultural University visit to Turmeric plot


जानवळे येथील अशोक रहाटे व रानवी येथील चंद्रकांत तेलगडे यांच्या दोन्ही SK-4 हळद लागवडीच्या प्लॉटला तसेच आबलोली येथील सचिन कारेकर यांच्या हळद लागवडीला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उद्यान विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक व हळद विषयावर संशोधन करणारे डॉ. प्रफुल्ल माळी यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी अतिशय सुंदर लागवड केली असल्याने समाधान व्यक्त केले. व शेतकरी अशोक रहाटे, चंद्रकांत तेलगडे यांचे कौतुक केले. SK-4 हळदीचे प्रणेते सचिन कारेकर यांचेशी हळद लागवड व प्रक्रिया याबाबत चर्चा केली. Konkan Agricultural University visit to Turmeric plot
यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती गुहागरचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे व दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी उपस्थित होते. Konkan Agricultural University visit to Turmeric plot