गुहागर, ता. 27 : तालुक्यातील 14 गावांमध्ये खारवी समाज राहतो या समाजाचा एकत्रित स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रविवारी (ता. 28 जुलै) सकाळी दहा वाजता खारवी समाज भवन हेदवतड येथे होत आहे. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Kharvi community gathering
गुहागर तालुक्यात कुडली, कातळे नवानगर, हेदवतड, साखरी आगर, वेळणेश्वर, वेळणेश्वर भाटी, कोंड कारूळ, बुधल, पालशेत, असगोली, वेलदूर, नवानगर, तरी बंदर आणि धोपावे या चौदा गावात खारवी समाजाची वस्ती आहे. मच्छीमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. 1 आँगस्टपासून मच्छीमारी व्यवसाय पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे या चौदा गावांमध्ये 2 महिने सुट्टीसाठी आलेले खारवी समाजातील नाखवा, तांडेल व खलाशी हे पुन्हा एकदा आपल्या मच्छीमार व्यवसायासाठी गुहागरतून बाहेर पडतील. तत्पूर्वी या संपूर्ण समाजाचे एकत्रीकरण करावे या उद्देशाने दरवर्षी खारवी समाज समिती या नोंदणीकृत संस्थेद्वारे अशा सभा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. Kharvi community gathering


यानिमित्ताने 14 गावातील खारवी समाज एकत्र येतो. आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर आदीविशेष शिक्षण घेतलेल्या, क्रीडा, कला आदी क्षेत्रात कौतुकास्पद यश कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार खारवी समाज समितीच्या वतीने केला जातो. या संस्थेच्या व्यासपीठावर समाजासमोरील प्रश्नांची चर्चा होते. वर्षभरात आरोग्य शिबिरे, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय निणर्यांबांबत कार्यवाही असेही कार्य केले जाते. रविवार 28 जुलै रोजी होणाऱ्या सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अशाच प्रकारे गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याबाबत विचारविनिमय होणार आहे. तसेच प्रत्येक गावातून या सभेच्या वेळी दोन रेकॉर्ड डान्स ग्रुपचे सादरीकरण होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन खारवी समाज समितीच्या वतीने करण्यात आले आहे. Kharvi community gathering