गुहागर, ता. 23 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिनांक 21 /9 /2024 रोजी सागरी किनारा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तवसाळ येथील काशिवंडे बीच स्वच्छ करण्यात आले. या अभियानामध्ये ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला. Kashiwande beach cleaning
याचबरोबर या पंधरवड्यामध्ये शाळा स्तरावर घोषवाक्य व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका बचत गट प्रतिनिधी यांच्यामार्फत गृहभेटी घेवून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे आव्हान सरपंच सौ प्रियांका सुर्वे मॅडम यांनी केले आहे. Kashiwande beach cleaning


यावेळी निर्मल ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे, सदस्य सौ नम्रता निवाते, ग्राम विकास अधिकारी निमकर, कर्मचारी वर्ग अमोल सुर्वे, दीपक बारस्कर प्रशिक्षणार्थी मंगेश झगडे, मुख्याध्यापक बाबरवाडी शाळा प्रमोद साळवी, नवानगर शाळा दिलीप गुरसुळे, तांबडवाडी शाळा अंकुर मोहिते, तवसाळ शाळा संदीप खंडगावकर, काताळे नंबर 1 शाळा दिपक चव्हाण, नवानगर उर्दू शाळा शाहीन पिंपरी, तवसाळ खुर्द अंगणवाडी सेविका छाया सुर्वे, कातळे नवानगर उर्दू अंगणवाडी सेविका फरीदा मॅडम, तांबडवाडी अंगणवाडी संगीता सुर्वे, अंगणवाडी मदतनीस आरती सुर्वे, राजेश्री कुरटे मॅडम त्याचबरोबर आशा सेविका तवसाळ खुर्द रश्मी गडदे, आशा सेविका तवसाळ भारती सुर्वे आशा सेविका काताळे अर्चना बारस्कर व बचत गट प्रतिनिधी स्वप्ना शिरधनकर, दीक्षा पवार महिला वर्ग अंकिता जाधव, स्वरा कुळ्ये, पूजा कुरटे, मानसी कुरटे उपस्थित होते. Kashiwande beach cleaning