गुहागर, ता. 08 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात बुधवार 13 ते 17 नोव्हेंबर 2024 या दिवसात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 11 व 12 रोजी श्री गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन देवस्थान अध्यक्षांच्या वतीने करण्यात आले आहे. Kartikotsav at Kopri Narayan Temple
दि. 11 ते 17 नोव्हेंबर 2024 रोजी स. 6.30 ते 7 वाजता श्रींची महापूजा, रात्रौ 9 वाजता आरती व मंत्रपुष्प, तसेच दि. 11 ते 16 नोव्हेंबर 2024 रोजी 7 ते 12.30 वाजता वेदमूर्ती घनपाठी श्री दत्तात्रेय महादेव मुरवणे यांच्या अधिपत्त्याखाली “ऋग्वेद संहिता स्वाहाकार” संपन्न होईल. सायं. 6.30 वाजता नित्य उपासना व आरती हे दैनंदिन कार्यक्रम करण्यात येणार आहेत. Kartikotsav at Kopri Narayan Temple
गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 11 रोजी रात्रौ 9.30 वाजता कार्तिकी एकादशीनिमित्त वरचापाट ग्रामस्थांचे भजन. मंगळवार दि. 12 रोजी रात्रौ 9.30 वाजता वर्धापन दिनानिमित्त श्री गोपाळकृष्ण आरती मंडळ, खालचापाट यांची आरती, बुधवार दि. 13 रोजी दुपारी 4 ते 6.30 या वेळेत महिलांचे हळदीकुंकू, रात्रौ 9.30 वाजता ह.भ.प. सुमंतबुवा भिडे यांचे सुश्राव्य किर्तन. गुरुवार 14 रोजी दुपारी 4 वाजता दुर्गाश्री महिला भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ 9.30 वाजता मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, (नाव नोंदणी करीता श्री. समीर घाणेकर यांचेकडे संपर्क साधावा.) शुक्रवार दि. 15 रोजी रात्रौ 10 वाजता श्री. वसंत कानेटकर लिखित “गोष्ट जन्मांतरीची” ही दोन अंकी नाट्यकलाकृती, शनिवार दि. 16 रोजी दुपारी 12 वा. “ऋग्वेद संहिता स्वाहाकार” पूर्णाहूती, रात्रौ 9.30 वाजता कै. श्री. गोविंदराव विठ्ठल पटवर्धन संगीत गौरव पुरस्कार 2024 व सांस्कृतिक कार्यक्रम, रविवार दि. 17 रोजी रात्रौ 9.15 वाजता ह.भ.प. सुमंतबुवा भिडे यांचे किर्तन होणार आहे. रात्रौ 10 वाजता कै. श्री. विद्याधर गोखले लिखित “जय जय गौरीशंकर” नाट्य कलाकृती सादर करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी कार्तिकोत्सवातील कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव कोपरी नारायण देवस्थानच्या अध्यक्षांनी केले आहे. Kartikotsav at Kopri Narayan Temple