• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कारगिल विजय रजत महोत्सवाचे आयोजन

by Guhagar News
February 1, 2024
in Bharat
38 0
1
Kargil Victory Silver Festival
75
SHARES
213
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून

रत्नागिरी, ता. 01 : लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून साकारलेल्या कारगिल विजय रजत महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीत शनिवार दि. 03 फेब्रुवारी 2024 रोजी कै. प्रमोदजी महाजन क्रीडा संकुल येथे संध्याकाळी 4 ते 6.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. Kargil Victory Silver Festival

1999 चे कारगिल युद्ध ! ज्यानी 16000 फूटाच्या उंच पहाडावर, रात्रीच्या निबिड अंधारामध्ये, उणे 20° तापमान, शत्रूकडून सातत्याने होणारा गोळीबार अशा प्रतिकूल परिस्थितीत शत्रू‌ला चारी मुंड्या चीत करुन, पॉईंट 5140 आणि 4875 वर तिरंगा फडकवला, असे वीरचक्राने सन्मानित ब्रिगेडीयर भास्कर व या युद्धभूमीवर आपला वैद्यकीय कौशल्याने 108 जणांवर उपचार करून जीवदान देणारे सैनिकांचे देवदूत डॉ. कर्नल  राजेश अढाऊ, सेनामेडल या कार्यक्रमात उपस्थित रहाणार आहेत. लक्ष्य फाउंडेशन च्या संस्थापिका सौ.अनुराधा प्रभुदेसाई या दोनही योध्यांसोबत कारगिल युद्धाच्या चित्तथरारक अनुभवाबद्दल दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवण्याचा व राष्ट्र प्रथम या विचाराचा जागर करण्याचा तसेच सुजाण आणि विवेकी युवक निर्माण करण्याचा लक्ष्य फाउंडेशनचा प्रयत्न आहे. Kargil Victory Silver Festival

याकरिता रत्नागिरी शहरातील शाळांमधून आठवी ते बारावीचे विद्यार्थी 5000 संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सुचना माननीय शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम यांचे मार्फत सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. ‘मेरा देश, मेरी पहचान’ ह्या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे याकरिता रत्नागिरीतील माजी सैनिक श्री. मोहन सातव, श्री. शंकर मिलके, श्री. विजय आंबेरकर तसेच श्री. नंदू चव्हाण यांनी शहरातील आणि शहर परिसरातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देवून शाळांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवण्याचा व राष्ट्र प्रथम या विचाराचा जागर करण्याचा तसेच सुजाण आणि विवेकी युवक निर्माण करण्याचा आग्रह मुळातच पालकांनी केला पाहिजे, अशा स्वरूपाचे राष्ट्रीय कार्यक्रमांना आपल्या मुलांना आवर्जून घेवून गेले पाहिजे अशी विनंती आयोजकांच्या वतीने सुहास ठाकूर देसाई यांनी केली आहे. Kargil Victory Silver Festival

माध्यमिक शाळांमध्ये दहा शैक्षणिक मूल्यांपैकी राष्ट्र भक्ती ही एक महत्त्वाचे मूल्य आहे.  सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत असतात मात्र सैनिकांचा सहभाग व विद्यार्थ्यांनचा त्यांच्याशी संवाद या आशयाचा हा कार्यक्रम प्रथमच रत्नागिरी मध्ये होत आहे याची माहिती श्री राजेश आयरे सर यांनी दिली आहे. हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी संतोष पावरी , कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, राजेश आयरे, नंदू चव्हाण, माजी सैनिक मोहन सातव, शंकर मिलके, विजय आंबेरकर मेहनत घेत आहेत. Kargil Victory Silver Festival

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKargil Victory Silver FestivalLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share30SendTweet19
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.