गुहागर, ता. 24 : खालचापाट येथील कन्हैया स्टार, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित कै. नरेश वराडकर व कै नरेंद्र वराडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेत कालिकामाता धोपावे संघाने हसलाई संघ वरवेली संघावर मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पाच दिवस करण्यात आले होते. Kanhaiya Star Mandal cricket tournament concluded
या स्पर्धेची पहिली उपांत्य फेरीची लढत ही स्वयंभू गणेश संघ अंजनवेल व कालिका माता धोपावे संघ यांच्यामध्ये होऊन कालिकामाता धोपावे संघाने विजय मिळविला. स्पर्धेची दुसरी उपांत्य फेरी ची लढत ही हसलाई देवी संघ वरवेली विरुद्ध वरदान देवी रानवी मध्ये झाली. यामध्ये हसलाई देवी वरवेली संघ विजयी झाला. हसलाई देवी विरुद्ध कालिकामाता धोपावे या दोन संघादरम्यान अंतिम फेरीची लढत झाली. अटीतटीच्या लढतीत कालिकामाता धोपावे संघ विजयी झाला. Kanhaiya Star Mandal cricket tournament concluded


प्रथम क्रमांक प्राप्त कालिकामाता धोपावे संघाला १५ हजार १५ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक हसलाई देवी वरवेली संघाला ११ हजार ११ रुपये व आकर्षक चषक देऊन गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज सुयोग शिंदे (हसलाई देवी), गोलंदाज चंदन सुर्वे (कालिकामाता धोपावे), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जितू अवेरे (हसलाई देवी संघ), अंतिम सामना सामनावीर प्रज्योत नाटेकर (कालिका माता धोपावे), मालिकावीर चंदन सुर्वे (कालिका माता धोपावे) यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले. तर या स्पर्धेत उगवता तारा म्हणून स्पर्श गोयथळे, यथार्थ मोरे, (कन्हैया स्टार क्रिकेट संघ ),राज शिंदे (हसलाई देवी) यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले. Kanhaiya Star Mandal cricket tournament concluded


या बक्षीस समारंभ कार्यक्रमाला मंदार कचरेकर, नेहा वराडकर, वृषाली ठाकरे, सुनील वराडकर, दिलीप गोयथळे, अमोल वराडकर, मिलिंद पडवळ, संतोष वराडकर, शोधन वराडकर, कन्हैया स्टार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मनीष गोयथळे, विष्णू होळंब आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी सिद्धार्थ वराडकर, तेजस वराडकर, स्वरूप वराडकर, सर्वेश वराडकर, सचिन गोयथळे, श्रीरंग वराडकर, अद्वैत पडवळ, यथार्थ मोरे, स्पर्श गोयथळे, सुदेश नागवेकर, आर्यन वराडकर आदींनी मेहनत घेतली. Kanhaiya Star Mandal cricket tournament concluded