अडूर श्री विठ्ठलाईदेवी मंदिर येथे दि. 24 डिसेंबर 2023 रोजी
गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संलग्नतेने व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि गुहागर तालुका असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ आयोजित एकदिवसीय ‘तालुकास्तरीय कबड्डी पंच व खेळाडू मार्गदर्शन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर रविवार दि. 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायं. 05 वाजेपर्यंत श्री विठ्ठलाईदेवी मंदिर अडूर येथे घेण्यात येंईल. Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adur
या शिबिरासाठी तालुक्यातील कबड्डी संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक व कमीत कमी 03 खेळाडू येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व तालुक्यातील जिल्हा व राज्य पंच यांनीही उपस्थित राहावे. तसेच पंच परीक्षा देऊ इच्छिणारे प्रशिक्षणार्थी ही यावेळी उपस्थित राहू शकतात. यावेळी उपस्थितांच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adur
कबड्डी पंच व खेळाडू मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व संघांचे प्रतिनिधी व इच्छुक प्रशिक्षणार्थी यांनी दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नोंद करावी. अधिक माहितीसाठी श्री. समित घाणेकर, पंच प्रमुख गुहागर /राज्य कबड्डी पंच सदस्य, भ्रमणध्वनी 8669837275 आणि श्री. निलेश खेडेकर, आयोजक प्रतिनिधी / राज्य कबड्डी पंच सदस्य, भ्रमणध्वनी 7774936784 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. Kabaddi Umpire and Player Guidance Camp at Adur