सेव्हन स्टार गुहागर संघ विजेता तर जय हनुमान गावमला संघ उपविजेता
गुहागर, ता. 01 : शिवमुद्रा क्रिडा मंडळ ओणी –लिंगायतवाडीतर्फे कबड्डी स्पर्धेचे दि. 26 व 27 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेत सेव्हन स्टार गुहागर संघाने जय हनुमान गावमला संघावर मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एकूण 17 संघांनी सहभाग घेतला होता. Kabaddi Tournament by Shivmudra Krida Mandal


दि. 26 व 27 जानेवारी या कालावधीत झालेल्या कबड्डी स्पर्धेत विजेता संघ- सेव्हन स्टार गुहागर, उपविजेता संघ- जय हनुमान गावमला, तृतीय क्रमांक -साई स्पोर्टस रायगड अ, चतुर्थ क्रमांक -साई स्पोर्टस रायगड ब, शिस्तबध संघ- श्री देव सोमेश्वर मठधामापूर तसेच उत्कृष्ट चढाई – चैतन्य लिंगायत (जय हनुमान गावमळा), उत्कृष्ट पक्कड – केदार लिंगायत (जय हनुमान गावमळा), स्पर्धेतील सर्वांत्कृष्ट खेळाडू / मालिकावीर – प्रसाद आलेकर (सेव्हन स्टार गुहागर) होते. Kabaddi Tournament by Shivmudra Krida Mandal
या स्पर्धेसाठी शिवमुद्रा क्रिडा मंडळ ओणी -लिंगायतवाडीतील सर्व सभासदांची खूप मेहनत घेवून अतिशय उत्तम कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी उपस्थित समाज बांधव प्रेक्षकांनी स्पर्धकांना भरभरून प्रतिसाद आणि कौतुक केले. Kabaddi Tournament by Shivmudra Krida Mandal