भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवस व ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमनानिमित्त
गुहागर, ता. 07 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र मा. श्री निलेशजी सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कोतळूक ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमन याचे औचित्य साधून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ग्रामदेवता सहाणेसमोर संपन्न झाल्या. या स्पर्धेत तृप्तीनगर अडूर संघ विजेता तर श्रीराम दत्त सेवा आरे संघ उपविजेता ठरला. Kabaddi tournament at Kotluk today
या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थ बापू महाडीक, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस दिनेश बागकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कबड्डी स्पर्धेतील विजेत्या तृप्तीनगर अडूर संघास रोख रक्कम १० हजार व चषक म्हणून गदा, उपविजेता श्रीराम दत्त सेवा आरे संघास रोख रक्कम ५ हजार व चषक म्हणून गदा देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक साई श्रद्धा बाग तर चतुर्थ क्रमांक सेव्हन स्टार गुहागर यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अडूर संघाचा प्रणय हळये याला टॉवर फॅन, पकड अमर नाटुस्कर, चढाई आरे संघाचा अविनाश शेटे यांना सन्मानित करण्यात आले तर अंतिम सामना सामनावीर प्रसन्न नार्वेकर याला पाण्याचा जार देण्यात आला. Kabaddi tournament at Kotluk


भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सुवासिनींनी औक्षण करून केक कापून व भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. स्पर्धा निरीक्षक पराग भोसले, पंच प्रमुख समीद घाणेकर यांनी काम पाहिले तर समालोचन दिपक देवकर, साई दाभोळकर, सुयोग आरेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजा हिंदुस्थानी मंडळातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. Kabaddi tournament at Kotluk


या दोन दिवसांमध्ये कोतळूक सरपंच प्रगती मोहिते, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, जिल्हा सरचिटणीस माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, स्पर्धेला बहुमोल सहकार्य करणारे कार्तिक कळझुणकर, झी २४ तासचे प्रणव पोळेकर, केतन पवार, जिल्हा उपाध्यक्ष, श्री दुर्गा देवी देवस्थान ट्रस्ट गुहागर अध्यक्ष किरण खरे, श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड अध्यक्ष शार्दुल भावे, कार्यवाह अमरदिप परचुरे, भाजपा गुहागर विधानसभा संयोजक सतीश मोरे, देवखेरकी उपसरपंच गणेश हळदे, महेश तटकरे, भाजपा गुहागर तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, दिनेश बागकर, आशिष विचारे, साईनाथ कळझुणकर, महिला आघाडीच्या अपूर्वा बारगोडे, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, दिलिप बागकर, संतोष सांगळे, मंदार पालशेतकर, नाना पालकर, महेश तोडणकर, नितीन कनगुटकर, सुनिल भेकरे, कोतळूक सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, व्हा. चेअरमन अनंत चव्हाण, देवस्थान कमिटीचे सचिव सिताराम कावणकर, आबा आरेकर, पोलिस पाटील संचिता मोहिते, विनोद शिगवण, मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, उदमेवाडी अध्यक्ष समीर ओक, उपाध्यक्ष नरेश बागकर आदींसह बहुसंख्येने मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. Kabaddi tournament at Kotluk