गुहागर, ता. 16 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची संयुक्त जयंती गुहागर आगारात प्रथमच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक अशोक चव्हाण, प्रमुख पाहुणे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सर्व अधिकारी व इतर प्रमुख पाहुणे यांचे हस्ते दीप प्रज्वलीत करण्यात आला. यानंतर बौद्ध उपासक अनंत जाधव (वरवेली), विशाल सावंत (पाटपन्हाळे) यांचे वतीने बुद्ध वंदना व भीमस्तुती घेण्यात आली व पूजन झाल्यावर प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीमध्ये गुलामगिरी या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. Jubilee celebration for the first time at Guhagar Agar


यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला आगार प्रमुख अशोक चव्हाण, पत्रकार पराग कांबळे, स्वप्नील शिंदे (स्थानकप्रमुख), वाहतूक नियंत्रक सुनील पवार, मनीष साखरकर, रामा पुंड, रवींद्र घाग, सौ सुषमा डोंगे यांचे सह रा. प. चे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थितीत होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामा पुंड यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यकांत भोसले यांनी केले. Jubilee celebration for the first time at Guhagar Agar