राष्ट्रीय नवरत्न पुरस्कारांचे होणार दिग्गज मान्यवरांच्या हस्ते वितरण
गुहागर, ता. 31 : महाराष्ट्र पत्रकार संघाचे २१वे महाधिवेशन तथा वर्धापन दिन सोहळा रविवार १ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता राज्यभरातील दिग्गज मान्यवर व तमाम पत्रकारांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील संजय घोडावत युनिव्हर्सिटीत अतिग्रे येथे संपन्न होणार आहे. सदर सोहळ्यासाठी राज्यभरातील शेकडो इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाचे पत्रकार व दिग्गज मान्यवर सदर महाअधिवेशनास उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर यजमान कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली. Journalists’ Association General Convention Ceremony


या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांचे “पत्रकारितेसमोरील आव्हाने व विश्वासार्हता”या विषयावर राज्यभरातील तमाम पत्रकारांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी महाअधिवेशन प्रसंगी पत्रकारिते संदर्भात विविध विषयावरील खुल्या चर्चा सत्राचे आयोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले असून पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भातील विविध ठराव पारित करून शासनास सादर करण्यात येणार आहेत.या अधिवेशनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राज्यभरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, उद्योग, चित्रपट, सहकार, पत्रकारिता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. Journalists’ Association General Convention Ceremony


तरी राज्यभरातील तमाम पत्रकार व हितचिंतकानी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सदर सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर, सचिव शेखर सूर्यवंशी, प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी,यजमान संयोजक कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार चौघुले,सुनील कांबळे, संजय सुतार,रमेश बोभाटे,दीपक पोतदार, बाबासाहेब नेर्ले, प्रा. रावसाहेब राशिनकर, ॲड. प्रकाश साळसिंगीकर, सर्व राज्य व विभाग कार्यकारिणी सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांनी केले आहे. सोहळा यशस्वीतेसाठी कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघ मेहनत घेत आहे. Journalists’ Association General Convention Ceremony