• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भातगावची प्रणाली सुवरे जिल्हा पोलीस दलात रुजू

by Ganesh Dhanawade
September 26, 2024
in Guhagar
247 3
0
Join the Suvare District Police Force
485
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील भातगाव सुवरेवाडी येथील सुकन्या कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिने जिद्द, चिकाटीमुळे  यशाच शिखर गाठले आहे. आपल्या ध्येयाला अगदी कमी वयातच आपलेसे केले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाली असून जिल्ह्यातील युवक युवतींसमोर एक नवा आदर्श  निर्माण केला आहे. Join the Suvare District Police Force

कु. प्रणाली सुवरे ही सध्या रत्नागिरी येथील पोलीस दलात सेवा बजावत आहे. प्रणालीच्या कुटुंबात कोणीच सरकारी सेवेत नाही किंवा कोणीही कोणत्या पोलीस खात्यात नोकरीला नाही. तरीही तिने देशाची सेवा करण्यासाठी पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. दत्तात्रय कीर हे तिचे गुरु असून त्यांनी तिला मार्गदर्शन केले आहे. तिच्या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कु.प्रणाली हिने सांगितले. Join the Suvare District Police Force

प्रणालीचे आई वडील हे दोन्ही अशिक्षित आणि पोटाची खलगी भरण्यासाठी शेती व्यवसाय करतात. कौटुंबिक परिस्थिती बिकट असताना देखील त्यांनी आपल्या मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. तिला शिकण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. मुलीच्या शिक्षणासाठी आई वडील शेती व्यतिरिक्त इतर ठिकाणी मोल मजुरी करून आपला कौटुंबिक व शैक्षणिक खर्च भागवत होते. म्हणूनच प्रणालीने आज या तिच्या यशाचा प्रथम श्रेय आपल्या आई वडिलांना व तिच्या कुटुंबातील सदस्यांना दिले आहे. Join the Suvare District Police Force

प्रणालीचे वय खूपच कमी आहे. २१ वर्ष ४ महिने असतानाच ती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सेवेत रुजू झाली आहे.  संपूर्ण भातगावातून कुणबी समाजाची पहिली महिला पोलीस बनण्याचा मान तिने एवढ्या कमी वयातच मिळवला आहे. तीचे अजूनही शिक्षण चालूच आहे. ती सध्या रत्नागिरी येथे एसवायबीएचे शिक्षण घेत आहे. प्रणालीला लहानपणापासूनच मैदानी खेळ खेळण्याची प्रचंड आवड होती. त्यात विशेष म्हणजे कबड्डी हा तिचा आवडता खेळ. तिने कबड्डी खेळामध्ये सोमेश्वर प्रतिष्ठान संघामधून खेळ चालू केला व ती महाराष्ट्र राज्याची कबड्डी निवड चाचणी खेळली आहे.  पोलीस भरतीच्या प्रशिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरवात केली. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती थोडी खालावलेली असल्याने तिने एक वर्ष शिक्षणं थांबविले व पोलीस भरतीचे प्रशिक्षण चालू केले. पहिले काही महिने तिने स्वतःलाच आपला गुरु बनविले व एकटी मैदानी शिक्षण घेत होती. त्यानंतर तिने शिवरत्न अकॅडमीमध्ये प्रवेश केला. तिथे तिने ५ महिने सर्व प्रशिक्षण प्रक्रिया समजून घेतली व स्वतःच स्वतःची गुरु बनली व पोलीस भरतीची परीक्षा देऊ लागली. पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आलं पण त्या अपयशाने ती खचली नाही. पोलीस भरतीची परीक्षा पास झाली. त्यामुळे प्रणाली आपल्या यशाचे दुसरे श्रेय हे आपल्या अकॅडमीतील प्रशिक्षक दत्तात्रय कीर यांना देते. सध्या आता प्रणाली रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई पद घेउन सरकारी सेवेत रुजू आहे. यापुढे पदवी परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस दलातील विविध उच्च पदावर जाण्याची तिने अपेक्षा आपल्या मनात बाळगल्या आहेत. Join the Suvare District Police Force

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiJoin the Suvare District Police ForceLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share194SendTweet121
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.