चिखली येथील कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजन
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चिखली येथील कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त पवार कुटुंबिय, IMA चिपळूण, अपरान्त हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल आणि गुहागर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जीवन संजीवनी प्रशिक्षण प्रशिक्षण शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूल येथे संपन्न झाले. Jeevan Sanjeevani Training at Patpanhale School
डॉ. राजेंद्र पवार यांनी या शिबिराबाबत माहिती दिली. जीवन संजीवनी (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन ) ही एक आपत्कालीन उपचार प्रक्रिया आहे. जी एखाद्या व्यक्तिचा श्वासच्छोवास किंवा हृदयाचे ठोके बंद झाल्यावर केली जाते. याविषयी जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे, त्याविषयीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये सर्व विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, पत्रकार, रिक्षा चालक, दुचाकी चारचाकी वाहन चालक, व्यावसायिक, ग्राहक, शासकीय कर्मचारी अधिकारी शिक्षक यांचा सहभाग होता. जीवन संजीवनी प्रशिक्षणामध्ये मोठ्या व्यक्तीसाठी काय करावे हे डॉ. रेडीज यांनी मार्गदर्शन केले आणि लहान मुलांसाठी काय करावे या बाबत डॉ. जोशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपसरपंच असीम साल्हे, डॉ. शिर्के, ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन चिपळूण अध्यक्ष डॉ. झबले यांनी मार्गदर्शन केले. Jeevan Sanjeevani Training at Patpanhale School
या कार्यक्रमासाठी गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते महेश कोळवणकर, मंगेश जोशी, मंगेश कदम, पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम साल्हे, वकील सुशील अवेरे, गौरव वेल्हाळ, वैभव आदवडे, ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन चिपळूण अध्यक्ष डॉ. झबले, डॉ. सुरेश भाले, डॉ. प्रकाश शिर्के, डॉ. रेडिज, डॉ. जोशी, डॉ. मंदार आठवले, डॉ. सौ. स्वप्नाली भाले, डॉ. सौ. बळवंत, डॉ. हांचाटे, डॉ. राजेंद्र पवार, दीपक पवार, तात्या पवार, संजय पवार व सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते. Jeevan Sanjeevani Training at Patpanhale School