राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आयोजन
चिपळूण, ता. 07 : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे जल्लोष – युवा शक्तीचा अनुप परंपरेचा – लोकजागर राज्यस्तरीय लोक नृत्य स्पर्धा – २०२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स व लोकनृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. Jallosh 2024 program at Chiplun
याबाबत आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या मार्गदर्शनानुसार चिपळूण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांनी जल्लोष – २०२४ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम गुरुवार दि. ८ व शुक्रवार दि ९ रोजी सायं. ५ वा. होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी लोकजागर हा राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. युवा कलाकारांना व स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. Jallosh 2024 program at Chiplun


या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व क्रीडा व युवक कल्याण बंदर मंत्री महाराष्ट्र राज्य मा. संजयजी बनसोडे साहेब व महिला व बालकल्याण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा. अदिती ताई तटकरे व जिल्हाधिकारी रत्नागिरी मा.देवेंद्र सिंह व महिला प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.सौ रूपालीताई चाकणकर हे प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत, तर चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम श्री ग्रामदेवता जुना कालभैरव देवस्थान प्रांगण, कै. बापू बाबाजी सागावकर मैदान, चिपळूण येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला लकी ड्रॉ च्या माध्यमातून अनेक बक्षिसे उपस्थित प्रेक्षकांना दिली जाणार आहेत. Jallosh 2024 program at Chiplun
तरी सदर कार्यक्रमात युवा कलाकारांनी, मित्र परिवार व प्रेक्षकांनी युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेयरमैन मनोज जाधव, सचिन पाटेकर, सचिन साडवीलकर, अनिकेत ओतारी, आल्हाद यादव, सिद्धेश लाड, दादू गढ़ेकर, अक्षया कांबळी, सागर कुंभार, क्रिश उन्नीकुट्टन, सूरज जाधव, मिनेश कापड़ी, खालिद दाभोलकर, राज कदम पुष्कर पीमपुटकर इत्त्यादि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. यांना आमदार श्री शेखर निकम सर, मिलिंद कापड़ी, नितिन ठसाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. Jallosh 2024 program at Chiplun