रौप्यमहोत्सव कार्यक्रम; गेली २५ वर्षे विना पौराहित्य विधिवत पूजा लक्षवेधी
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील अडूर येथे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात पार पडली. पुण्यतिथी स्मरणोत्सव निमित्त तेली ज्ञाती बांधव, अडूरच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महापुजेदरम्यान गेली २५ वर्षे विना पौराहित्य विधिवत पूजा लक्षवेधी ठरली आहे. Jaganade Maharaj’s death anniversary at Adur
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दुपारी महाआरती, महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर संध्याकाळी श्री.विठ्ठलाईदेवी प्रासादिक भजन मंडळ अडूर यांच्या पुरुष व महिला यांचे स्वतंत्र सुस्वर भजने पार पडली. या कार्यक्रमासाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचे पदाधिकारी व ज्ञाती बांधव तसेच अडूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेली ज्ञाती बांधव अडूरच्या ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. Jaganade Maharaj’s death anniversary at Adur