अंतराळात कचरा न सोडता दाखल
नवीदिल्ली, ता. 26 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. इस्रोचं रॉकेट PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल ३नं अंतळारात कुठलाही कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चार दिवसांपूर्वी अर्थात २१ मार्च २०२४ या रॉकेटनं ही कामगिरी केली. इस्रोनं ट्विट करत या मोहिमेची माहिती दिली. ISRO’s rocket back to earth orbit
इस्रोनं सोमवारी सांगितलं की, त्यांच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनानं (PSLV) शून्य ऑर्बिटल डेब्रिस मोहीम पूर्ण केली आहे. याला ‘आणखी एक मैलाचा दगड’ असं इस्रोनं म्हटलं आहे. 21 मार्च रोजी ही मोहिम फत्ते झाली असून यामध्ये PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-3 नं (POEM-3) पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करून ते उद्ध्वस्त झालं. पण विशेष म्हणजे यामध्ये PSLV-C58/XPoSat या मोहिमेनं अंतराळ कक्षेत शून्य कचरा सोडला” असं इस्रोनं म्हटलं आहे. ISRO’s rocket back to earth orbit
इस्रोच्या म्हणण्यानुसार, सर्व उपग्रहांना त्यांच्या इच्छित कक्षेत पोहोचवण्याचं प्राथमिक अभियान पूर्ण केल्यानंतर, PSLV च्या टर्मिनल स्टेजचं 3-अक्ष स्थिर प्लॅटफॉर्म, POEM-3 मध्ये रूपांतर झालं. स्टेजला 650 किमी ते 350 किमी पर्यंत डिऑर्बिट केलं गेलं. ज्यामुळं त्याचा लवकर पुन्हा प्रवेश करणं सुलभ झालं. या पेलोड्सची उद्दिष्टे एका महिन्यात पूर्ण झाली. इस्त्रोनं या मोहिमेवर भाष्य करताना म्हटलं की, इस्रो एक जबाबदार अंतराळ संस्था असल्यानं, प्रगत डेब्रिज ट्रॅकिंग सिस्टीम, स्पेस-ऑब्जेक्ट डीऑर्बिटिंग तंत्रज्ञान आणि जबाबदार उपग्रह उपयोजन पद्धतींच्या विकास आणि अंमलबजावणीद्वारे हा धोका कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे, अशा प्रकारे वर्तमान आणि भविष्यातील अंतराळ प्रयत्नांसाठी कक्षीय वातावरणाचं रक्षण करते, असंही त्यात म्हटलं आहे. ISRO’s rocket back to earth orbit