संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ, पेवे शाखा क्र. १३ या धम्म संघटनेचे माजी अध्यक्ष व पेवे विभाग क्र. २ चे माजी विभाग अधिकारी प्रशांत रामचंद्र जांबुर्गेकर यांची सुकन्या कु. ईशा जांबुर्गेकर हिने चिपळूणच्या गुरुकुल महाविद्यालयाlमधून पंधरावीच्या (बीएससी आयटी ) परीक्षेत ९७ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. Isha Jamburgekar’s success in B.Sc. IT exam


ईशा जांबुर्गेकर हिच्या या घवघवीत यशाबद्दल बौद्ध समाजासह सर्वच सामाजिक स्तरातून तीचे तीच्या आई – वडिलांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत असून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. Isha Jamburgekar’s success in B.Sc. IT exam