योग प्रशिक्षिका सौ. अदिती धनावडे यांचे प्रतिपादन
गुहागर, ता. 21 : शारिरिक व मानसिक आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. प्राणायाम हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. यातून शारिरिक व मानसिक शक्ती बळकट होते. आरोग्य तर निरोगी राहतेच पण मन सुद्धा निरोगी राहते. फक्त योग दिनीच योगासने किंवा व्यायाम न करता तो दररोज व नियमितपणे करावा, असे आवाहन योग प्रशिक्षिका सौ. अदिती धनावडे यांनी केले. International Yoga Day
तालुक्यातील तळवली व चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षिका अदिती धनावडे यांनी उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी वर्ग व उपचारासाठी आलेल्या रुग्णांना योगाचे महत्त्व पाठवून देत प्रात्यक्षिके करून दाखविले. तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. सी. वाडकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय सानप, योगेश गायकवाड, के. एन. लाकडे, शोभा पवार, शीतल किल्लेकर, श्रीमती उषा जाधव, एस. के. भालेराव, अजित पाटील, ज्ञानेश्वर जाधव, मंगेश कोलकांड, कमलेश लाकडे आदी तर चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कांबळे, श्रीमती एम. एस. पानगळे, समिधा गुरव, राकेश पवार, मीनाक्षी गमरे, गंगाधर गमरे, मनोहर गुरव, सुनंदा गुरव, शांताराम लोबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. International Yoga Day
चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. सी. वाडकर म्हणाल्या, प्राचीन भारतात शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी चिकित्सक पद्धती म्हणजे योगासने होय. दररोज योग केल्याने शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ लाभते. सुदृढ व निरोगी शरीरासाठी योग नियमित करणे काळाची गरज बनली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कांबळे यांनी योगाचे महत्त्व कोरोना काळात आपल्या सारख्या असंख्य नागरिकांना कळले. आजच्या युगात निरोगी आणि सशक्त आरोग्यासाठी योगासने करणे काळाची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. International Yoga Day