विविध वयोगटातील १००० हून अधिक धावपटूंची नोंदणी पूर्ण
रत्नागिरी, ता. 30 : ७ जानेवारी २०२४ रोजी धावनगरी रत्नागिरी या टॅगलाईनने होणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनची सर्वात मोठी खासियत म्हणजे इन्फ्युएन्सर आणि पेसर. भारतात असे विविध धावपटू आहेत ज्यांना सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत असे धावपटू रत्नागिरीत येतायत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांना सोशल मीडियावरील फोलो करणारे धावपटू देखील रत्नागिरीत दाखल होणार आहेत. पहिल्याच वर्षी 1000 पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार ही मॅरेथॉन होण्याकरिता आयोजक सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि सर्व सहकारी संस्था आणि रत्नागिरीकरांचे प्रयत्न सुरू आहेत. Influencers and Pacers’ Choice for the Coastal Marathon


एन्फ्लुएन्सरप्रमाणे पेसर हे देखील या स्पर्धेत रत्नागिरीकरांना प्रथमच पाहायला मिळणार आहेत. पेसर म्हणजे एखादी व्यक्ती एखादं अंतर ठराविक वेळेत पार करते म्हणून त्यांना पेसर घोषित केलं जातं. समजा कोणाकडे मोबाईल, गॅझेट नाहीये पण ठराविक वेळेमध्ये अंतर पार करायचे असेल तर पेसर्सबरोबर धावल्यानंतर आपलं अंतर तेवढ्या वेळेत पार करू शकतो. असे नियमित सराव करणारे धावपटू ठरलेल्या वेळेत २१ किलोमीटर अंतर पार करणार आहे. हाफ आयर्नमॅन असलेले रत्नागिरीचे समीर धातकर हे या स्पर्धेत १ तास ५९ मिनीटांमध्ये २१ किलोमीटर अंतर पार करणार आहेत. अन्य स्पर्धक त्यांच्यासोबत धावू शकतात. ज्यांना ही स्पर्धा दोन तासांच्या आत पूर्ण करायची आहे ते समीरसोबत धावू शकतात. २१ किलोमीटर अंतर २ तास ३० मिनीटांमध्ये चिपळुणचे डॉ. स्वप्नील दाभोळकर पार करणार आहेत. ते या स्पर्धेचे पेसर आहेत. यांच्यासोबतही अन्य स्पर्धक धावू शकतात. तसेच पावणेतीन व तीन तासांतही हे अंतर पार करणारे पेसर कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. Influencers and Pacers’ Choice for the Coastal Marathon
१० किलोमीटरच्या सर्व पेसर या रत्नागिरी शहर आणि आसपासच्या महिला आहेत. युगंधरा मांडवकर ५४ मिनिटात सत्वशीला पाडावे ६५ मिनिटात, उमली पाटील ७५ मिनिटांत तर आरती दामले- पानवलकर ९० मिनिटात दहा किलोमीटर अंतर पार करणार आहेत. खऱ्या अर्थाने वुमन एमपॉवर्मेंट म्हणता येईल अशी ही संधी आहे. Influencers and Pacers’ Choice for the Coastal Marathon