प्रा. बाबासाहेब सुतार; गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात भारतीय गणित कार्यशाळा
रत्नागिरी, ता. 01 : खगोल गणित करताना त्याचे ठोकताळे जमिनीवरून मांडावे लागतात. मात्र अशा गणितात अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन खगोल अभ्यासक आणि प्राध्यापक बाबासाहेब सुतार यांनी केले. ते भारतीय गणित कार्यशाळेत बोलत होते. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग (रामटेक) आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग आयोजित भारतीय गणित कार्यशाळेत ते बोलत होते. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ही कार्यशाळा झाली. Indian Mathematics Workshop


प्रा. सुतार म्हणाले की, अंकांची आकडेमोड करताना आपल्याला निश्चित स्थान माहित असणं आवश्यक आहे. शिवाय खगोल गणितात जे गणित आपण मांडतो त्यातील सर्व भाग हा अंतराळात अथवा अवकाशात असतो. त्यामुळे आपल्याकडे प्रमाण माहिती असणं गरजेचे आहे. या वेळी प्रा. सुतार यांनी २७ नक्षत्र, १२ राशी यांची स्थाने, ग्रह , पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांचा आंतरसंबध स्पष्ट केला. Indian Mathematics Workshop
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. राजीव सप्रे, अन्वेष देवुलपल्लि, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. प्रज्ञा भट आणि सहभागी विद्यार्थी शिक्षक व रत्नागिरी उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. Indian Mathematics Workshop