• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संतोष जैतापकर यांची अपक्ष उमेदवारी

by Mayuresh Patnakar
October 29, 2024
in Politics
221 2
1
Independent candidature of Santosh Jaitapkar

उमेदवारी अर्ज भरताना संतोष जैतापकर

434
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरपीआय आठवले गटातर्फे संदेश मोहिते रिंगणात

गुहागर, ता. 29 : भाजपच्या जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्याचबरोबर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) पक्षाचे संदेश मोहिते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. Independent candidature of Santosh Jaitapkar

Independent candidature of Santosh Jaitapkar
उमेदवारी अर्ज भरताना संदेश मोहिते

महायुतीकडून भाजपला उमेदवारी अर्ज न मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून माझ्यावर उमेदवारी अर्ज भरण्याबाबत दबाव होता. त्यामुळे आपण अर्ज भरल्याचे जैतापकर यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, विनय नातू यांच्या नावाची चर्चा सुरु होती त्यावेळी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची माझी भुमिका होती. मात्र महायुतीकडून भाजपला उमेदवारीच मिळाली नाही. नाराज कार्यकर्त्यांनी आग्रह केला. त्यामुळे सोमवारी भाजपच्या पदाचा राजीनामा देवून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोकणातील खेडी रोजगाराविना, उद्योगधंद्यांविना ओस पडत आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. Independent candidature of Santosh Jaitapkar

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षातर्फे संदेश मोहीते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे पट्‍टे त्यांनी गळ्यात घातले होते. त्यांच्या वाहनावरही सर्व पक्षांचे झेंडे लावण्यात आले होते. आमच्या पक्षाकडून अधिकृतरित्या आम्हाला कोण उमेदवार याची माहितीच दिली गेली नसल्याचे मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले. आरपीआयची कोकणात ताकद आहे. आम्ही शासनाच्या माध्यमातून अनेक गावात विकासकामे केली आहेत. त्यामुळे महायुतीने आम्हाला संधी द्यायला हवी. ही निवडणूक आम्ही पक्षाध्यक्ष ॲड. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती म्हणूनच लढविणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. Independent candidature of Santosh Jaitapkar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndependent candidature of Santosh JaitapkarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share174SendTweet109
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.