• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्रात रस्ते प्रवास महागला

by Guhagar News
January 24, 2025
in Maharashtra
209 3
0
Increase in ST ticket fare
411
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एसटी तिकीट दरात 14.95% भाडेवाढ

गुहागर, ता. 24 : ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’, अशी पंचलाईन घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सामान्य नागरिकांना दणका दिला आहे. राज्यातील रस्ते वाहतूक दरात बदल करण्यात आले असून, त्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्याच्या परीवहन विभागने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारा चालविण्यात येणाऱ्या बस वाहतूक तिकीट दरात (ST Bus Ticket Prices) तब्बल 14.15% इतकी वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ इतक्यापुरतीच मर्यादित नाही. तर, मंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी दरातही भाडेवाड करण्यात आली आहे. संभाव्य भाडेवाड तीन रुपयांची असणार आहे. Increase in ST ticket fare

Big boost to Maharashtra's development

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी तिकीट वाढीस मान्यता देण्यात आली. ही वाढ येत्या तीन फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार असल्याचे समजते. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यांमुळे एसटीवर जवळपास 3 कोटी रुपयांचा बोजा पडत असतो. अशा वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षीत असते असेही त्यांनी एबीपी माझा नावाच्या वृत्तवाहिणीशी बोलताना सांगितले. Increase in ST ticket fare

केवळ एसटीच नव्हे तर त्यापाठोपाठ आता रिक्षा आणि टॅक्सी प्रवासही महागला आहे. ज्यामध्ये किमान तीन रुपयांची भाववाढ अपेक्षीत आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाचा मिठर साधारण 23 वरुन 26 रुपये तर टॅक्सी कमान 28 वरुन 31 रुपये भाडेवाड होणे अपेक्षीत आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीच्या या संभाव्य भाडेवाडीस मंजुरी मिळणार असल्याचे समजते. दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी यांचे मीटर प्रमाणीकर आणि इतर काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर ही भाडेवाड लागू होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, या भाडेवाडीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. सर्वच बाबींमध्ये वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांना सरकार नेमका कोणता दिलासा देते याबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. नागरिकांच्या खिशावर बोजा वाढत असताना देखील आम्ही सामान्य जनतेचे प्रतिनिधीत्त्व करतो, असा दावा सरकार करत असते. Increase in ST ticket fare

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIncrease in ST ticket fareLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share164SendTweet103
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.