महिला सन्मान योजना, गुहागर आगार प्रमुखांची माहिती
गुहागर, ता. 21 : महिला सन्मान योजनेंतर्गत गुहागर बसस्थानकामार्फत वर्षभरात तालुक्यातील ४९ लाख ७७ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन एसटीतून प्रवास केल्याची माहिती गुहागर आगारप्रमुख सोनल कांबळे यांनी दिली. महाराष्ट्रात एसटीने कुठेही एसटी प्रवास करण्यासाठी तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे देवदर्शन, पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. महिला सन्मान योजनेंतर्गत एसटीच्या कोणत्याही बसमधून प्रवास करणे सुलभ झाले आहे. महिला सन्मान योजनामुळे प्रवासी संख्येत आणि एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. Increase in number of women passengers in Guhagar
शासनाने १७ मार्च २०२३ पासून महिलांसाठी महिला सन्मान योजना जाहीर केली. तिकीट दरात ५० टक्के सवलत असल्याने महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्यात गुहागर बस्थानकामार्फत महिलांनी प्रवास केला. एसटीतून कुठेही निम्म्या तिकिटात प्रवास करणे सुलभ झाले आहे. देवदर्शन, पर्यटनासाठी महिला बाहेर पडल्या आहेत. महिला प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात वाढ झाली आहे. Increase in number of women passengers in Guhagar