गुहागरातील बागायतदारांची मागणी
गुहागर, ता. 06 : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीत सातत्याने सापडलेले गुहागर तालुक्यात सुपारी पीक यावर्षी भरघोस आले आहे. मात्र, बाहेरुन होणाऱ्या निर्यातीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत सुपारीच्या दरात घसरण झालेली असल्याने मोठा आर्थिक फटका गुहागरच्या सुपारीला बसला आहे. त्यामुळे राज्याच्या फळबाग लागवड योजनेत सुपारी पिकाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. Include betel nut in the orchard planting plan
सुपारी पिकासाठी प्रसिध्द असणारे गुहागर तालुक्यातील पालशेत, वडद, गिमवी व काळसूरकौढर, गुहागर ही गावे ओळखली जातात. येथील बागायतदारांचे हमखास उत्पन्नाचे साधन म्हणून सुपारी पिकाकडे पाहिले जाते. गुहागर तालुक्यातील एकट्या पालशेतमध्ये दरवर्षी सुपारीचे पीक 70 ते 80 टन होते. त्या पाठोपाठ वडद व गुहागरचा नंबर लागतो. यावर्षी गुहागर तालुक्यात विशेष करुन पालशेत व वडदमध्ये सुपारीचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. Include betel nut in the orchard planting plan


सुपारीला प्रत्येक मंगल कार्यात पूजेचा मान असतो. गुहागर तालुक्यातील सुपारी वाशी मार्केटमध्ये विक्रीला जाते. तिथून ती गुजरातला मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. सुपारीचे पीक कोकणात जास्त आहे. मात्र, थायलंडसारख्या देशातून व कर्नाटक राज्यातून सुपारी स्थानिक बाजारपेठेत कमी दराने व्यापाऱ्यांना विकली जात असल्याने स्थानिक बागायदारांच्या सुपारीचा उठाव होत नाही. गेल्यावर्षी ४०० ते ५०० रुपये किलोने जाणारी सुपारी यावर्षी साडेतीनशे दराने विकत घेतली जात आहे. त्यामुळे सुपारी बागायतदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. खते, सुपारीची देखभाल, साफसफाई, सुपारी सोलणे मजुरी आदी खर्च यातून सुटत नाही. त्यातच वानर, माकडांचा उपद्रव असल्याने सुपारी फळाचे मोठे नुकसान होते. Include betel nut in the orchard planting plan
राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. या योजनेत १५ फळांचा समावेश असून १०० अनुदान आहे. मात्र, यामध्ये सुपारीचा समावेश नसल्याने बागायतदारांना या योजनेचा लाभ मिळत नाही. यावर्षी या योजनेसाठी आम्ही गुहागर तालुक्यातून प्रस्ताव पाठविले आहेत. पुढील कार्यवाही कशी होते यावर सर्व अवलंबून आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी दिली. Include betel nut in the orchard planting plan