राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र १ च्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली येथील राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र १ च्या वतीने जिल्हा परिषद रत्नागिरी इमारती बांधकाम विभाग गुहागर, पंधरावा वित्त आयोग कार्यक्रम सन २०२०/२१ या योजनेतून झालेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५० हजार लीटर टाकीचा उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. Inauguration of Water Tank at Varveli


यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र १ च्या वतीने कै. वसंत गोविंद मालप स्मृती रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविकामध्ये मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनिल रांजाणे यांनी पाण्याची टाकीचे काम झाल्याबद्दल आ. भास्कर जाधव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे विशेष आभार मानले. तसेच नवीन नळपाणी योजनेसाठी विहिरीची मागणी केली. या कार्यक्रमात पिण्याच्या पाण्याच्या टाकीला विनामूल्य जमीन देणाऱ्या विशाल धोंडू रांजाणे, नवीन होणाऱ्या नळपाणी योजनेच्या विहिरीसाठी जमीन देणाऱ्या हरिश्चंद्र रांजाणे, तसेच मंडळाला शासकीय कामात विशेष सहकार्य करणाऱ्या तंटामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार, रांजाणेवाडीतील पथदिवे प्रकाशमान करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या युवा कार्यकर्ता प्रसाद विचारे, वाडीच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या राजहंस नमन मंडळ रांजाणेवाडी गट क्रमांक १ चे मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनिल रांजाणे, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष अनंत जावळे, सचिव संतोष रांजाणे या सर्वांचा विशेष सत्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. Inauguration of Water Tank at Varveli
यावेळी सरपंच नारायण आगरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मनोगते व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विनायक मुळे, सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, सतीश शेटे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, धनश्री चांदोरकर, संदीप पवार, श्रावणी शिंदे, सेजल शिंदे, अरुण रावणंग, प्रशांत विचारे, प्रसाद विचारे, अनिल रांजाणे, अनंत जावळे, संतोष रांजाणे, ग्रामसेवक महेंद्र भुवड, शिवराम रांजाणे, हरिश्चंद्र रांजाणे, नारायण रांजाणे, यशवंत रांजाणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विक्रांत जाधव, दीपक किर्वे, अविनाश रांजाणे, विशाल रांजाणे, गणेश रांजाणे आदी मान्यवर उपस्थित होते. Inauguration of Water Tank at Varveli