विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरी, ता. 26 : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे उद्घाटन सोमवारी संपन्न झाले. संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या शुभहस्ते योगभवनाचे उद्घाटन संपन्न झाले. या वेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे आणि वैद्य मंदार भिडे उपस्थित होते. Inauguration of Tilak Yoga Bhavan at Ratnagiri
यावेळी नाणिज येथील गुरुकुल मधील विद्यार्थ्यानी वैदिक मंत्र घोष केला आणि याच मंत्र घोषात सुरुवातीस कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते योग भवनाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यानंतर उपकेंद्रात योगशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या एमए योगशास्त्र आणि बीए योगशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. Inauguration of Tilak Yoga Bhavan at Ratnagiri
यावेळी रत्नागिरीतील सुपरिचित वैद्य मंदार भिडे यांनी आपल्या अमोघ वाणीतून आयुर्वेद, दिनचर्या आणि स्वास्थ्य यावर विस्तृत प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले की, आपल्या शास्त्रात विविध विषयाचे अमूल्य ज्ञान आहे. केवळ त्याची अंमलबजावणी आपल्या आयुष्यात करणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नियम पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन स्वरूप काणे यांनी केले. Inauguration of Tilak Yoga Bhavan at Ratnagiri