दि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी वेद घोषाने दुमदुमणार रत्नागिरी
रत्नागिरी, ता. 04 : महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाचा शुभारंभ भव्य शोभायात्रेने होणार आहे. या शोभायात्रेला सुरुवात दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत माधवराव मुळे भवन येथून होणार आहे. Inauguration of Regional Vedic Conference
ही शोभा यात्रा म्हणजे केवळ धार्मिक समारंभ नाही, तर ते वैदिक संस्कृती, परंपरा, आणि तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचे एक प्रभावी माध्यम आहे. यात्रेतील विविध धार्मिक प्रतीक, मंत्रोच्चारण, आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती लोकांच्या मनामध्ये धार्मिक एकता आणि सद्भावना जागवतील. तसेच, हे कार्यक्रम स्थानिक समुदायातील एकजूट, सामूहिक भावना वाढवण्यास मदत करणारी आहे. Inauguration of Regional Vedic Conference
स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा प्रचार करणे, धार्मिक एकता आणि सामूहिक भावना वाढवणे, समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना एकत्र आणणे, हा या शोभायात्रेचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे. Inauguration of Regional Vedic Conference