संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाचेरीसडा पंड्येवाडी येथील चाफवण्याचा प-या येथे आमदार भास्करशेठ जाधव यांनी मंजूर केलेल्या बंधा-याचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. विक्रांतदादा भास्करशेठ जाधव यांचे शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. Inauguration of dam at Pacherisada


यावेळी जेष्ठ शिवसैनिक श्री. विनायक मुळ्ये, तालुका प्रमुख सचिनशेठ बाईत, विभाग प्रमुख रविंद्र आंबेकर, शाखा प्रमुख संतोष आंब्रे, युवा सेना प्रमुख सागर डिंगणकर, पंड्येवाडीचे अध्यक्ष कृष्णा पंड्ये, गावकर पंड्ये, अनिल जोशी, ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ पावरा यांचेसह वाडीतील मुंबई व गावचे स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होते. Inauguration of dam at Pacherisada

