रत्नागिरी, ता. 08 : गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले असून, भव्यदिव्य स्वरूपात साकारलेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता परिवहन मंत्री तथा म.रा.मा.प. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. Inauguration ceremony of Ratnagiri bus stand


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात झालेल्या समंजस करारानुसार रत्नागिरी जिल्हातील रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नुतनीकरण व वाहनतळ काँक्रीटीकरण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ रत्नागिरी यांच्याकडून हाती घेण्यात आले होते. रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नुतनीकरण व वाहनतळ काँक्रिटीकरणाच्या कामासाठी अंदाजे १७.५० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार या कामाला फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली. Inauguration ceremony of Ratnagiri bus stand


या कामामध्ये भव्यदिव्य प्रशस्त असे ग्रामीण व शहरी एकत्रित बसस्थानक बांधण्यात आले असून, त्यामध्ये प्रशस्त बसस्थानक इमारत, ग्रामीण बसेस करीता १४ फलाट व शहरी बसेस करीता ६ फलाटांची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे, रा.प.चालक व वाहक (महिला व पुरुष) यांच्यासाठी सर्व सोयींयुक्त वातानुकूलित विश्रांतीगृह, सर्व सोर्थीयुक्त वातानुकूलित हिरकणी कक्ष, स्थानक प्रमुख कार्यालय, रा.प.चे इतर कार्यालये, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष, विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र प्रशस्त उपहारगृह, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह प्रशस्त प्रवाशी प्रतिक्षालय, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र महिला व पुरुष प्रवाशी प्रसाधनगृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीणसाठी ६ वाणिज्य अस्थापना गाळे व शहरीसाठी १८ वाणिज्य गाळे उपलब्ध करून दिले आहे. संपूर्ण बसस्थानक वाहनतळास काँक्रीटीकरण व ड्रेनेज व्यवस्था करण्यात आली आहे. Inauguration ceremony of Ratnagiri bus stand