रेशन कार्ड ई-केवायसी केलेले नसल्यास 15 फेब्रुवारीनंतर धान्यमिळणार नाही
गुहागर, ता. 27 : केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच एक योजना म्हणजे रेशन कार्ड ही आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी दरात रेशन दिले जाते. Important news for ration card holders
या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते. गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी दरात दिल्या जातात. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ होतो. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केले नाही, त्यांना रेशन मिळणार नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी मिळणे आवश्यक आहे. ई-केवायसीमुळे कोणाकडे बनावट रेशनकार्ड आहे, याचा खुलासा होतो. आपण आपल्या जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ई-केवायसी करू शकता किंवा आपण ऑनलाइन ई-केवायसी देखील करू शकता. Important news for ration card holders