मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचतर्फे आयोजन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 16 : आबलोली ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद व विधवा महिलांचा सन्मान हे उपक्रम राबविले होते या उपक्रमाला आबलोली गावचे सुपुत्र व पत्रकार संदेश कदम यांनी विवीध वृत्तपत्रातून प्रशिद्धी देण्याचे निस्वार्थीपणे काम केले होते याची दखल घेऊन मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच खेरशेत, तालुका चिपळूण या सेवाभावी संस्थेने आबलोली ग्रामपंचायतींला मान्यवरांचेहस्ते स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर “आयडॉल रत्नागिरी सन्मान २०२३” हा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. “Idol of Ratnagiri” Award to Gram Panchayat Abloli
यावेळी सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके, ग्रामसेवक श्री.बाबूराव सुर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.आप्पा कदम, पत्रकार श्री.संदेश कदम, उपसरपंच श्री.अक्षय पागडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.संजय कदम यांनी मान्यवरांचे उपस्थितीत अॅड.स्मिता कदम यांचे हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक देऊन सरपंच सौ.वैष्णवी नेटके आणि सहकारी यांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा नुकताच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन चिपळूण येथे जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचे उपस्थितीत दिव्य स्वरुपात संपन्न झाला. “Idol of Ratnagiri” Award to Gram Panchayat Abloli
यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी श्री.संजयराव कदम, रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फूले, दैनिक रत्नभूमीच्या मालक, संपादिका श्रीमती.धनश्री पालांडे, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त अधिकारी डॉ.महेंद्र गावडे, खेड तालुका न्यायालयाच्या सरकारी वकील अॅड.स्वाती कदम, यश सिद्धी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते, चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, स्वागताध्यक्ष सौ.राजमुद्रा कदम आदी.मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुहास पवार सर यांनी केले तर प्रास्ताविक सौ.राजक्रांती कदम तांबे यांनी केले “Idol of Ratnagiri” Award to Gram Panchayat Abloli