गुहागर, ता. 14 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांचा स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचा क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीमंच, खेरशेत संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्यावतीने रविवार दि. १० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला होता. Idol of Ratnagiri Award to Ambekar


या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या विधवा अनिष्ट प्रथा बंदच्या ठरावानुसार अंमलबजावणी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, महिला बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्था आणि जेष्ठ समाजसेवक यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतिशील कार्यवाहीच्या माध्यमातून जनजागृतीपरत्वे गेली २८ वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण व एड्स या क्षेत्रांत कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच संस्थेच्यावतीने आदेशाची अंमलबजावणी करत आहे. Idol of Ratnagiri Award to Ambekar


सदर सोहळ्यात ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम सभेत ठराव मंजूर करून विधवा अनिष्ट प्रथा, पुर्वापार चालत आलेल्या कालबाह्य रूढी-परंपरा, बालविवाह आणि अंधश्रद्धा यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी स्वतःच्या घरापासून म्हणजे काकांच्या निधनाच्या अंत्यसंस्कार सोपास्काराच्या वेळी काकीचे कोणतेही अलंकार न उतरवता ग्रामस्थांच्या सहकार्याने अंतविधी पार पाडला. तसेच विधवा महिलांना धार्मिक कार्यात हळदीकुंकू देऊन सन्मान करण्याची प्रथा चालू केली. अशा प्रकारे विधवांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सरपंच जनार्दन आंबेकर यांना स्त्री मुक्ती स्वातंत्र्याचा क्रांतीसुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ सन्मानार्थ पुरस्कार देऊन नामवंतांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. Idol of Ratnagiri Award to Ambekar
सदरचा सन्मान मिळण्या मागे उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि उमराठ बुद्रुक या दोन्ही महसुली गावांतील ग्रामस्थांचा आणि उमराठ ग्रामपंचायतचे ग्राम सेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ, कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व डाटा ऑपरेटर शाईस दवंडे यांचे सक्रिय सहभाग व सहकार्याचे मोलाचे योगदान लाभल्यामुळे त्यांचे सुद्धा सरपंच जनार्दन आंबेकर यांनी धन्यवाद देऊन आभार मानले आहेत. Idol of Ratnagiri Award to Ambekar