रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार पुरस्कार वितरण
गुहागर, ता. 20 : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या येथील लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर यांना नवभारत वृत्त समूहाचे मराठी राष्ट्रीय दैनिक नवराष्ट्रच्या वतीने आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार जाहीर झाला आहे. हा नवराष्ट्र सन्मान सोहळा रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. रत्नागिरी येथील “सावंत पॅलेस” येथे आयोजित करण्यात आला आहे. Ideal Social Institution Award to Aarekar Pratishthan


या नवराष्ट्र सन्मान सोहळा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह , रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी नगर परिषदचे मुख्याधिकारी तुषार बाबर, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्राइवेट लिमिटेडचे प्रशांत यादव, बांधकाम व्यावसायिक दीपक साळवी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. Ideal Social Institution Award to Aarekar Pratishthan