आदर्श चषक -२०२४, अर्षित इलेव्हन शीर उपविजेता
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आदर्श नवतरुण मित्र मंडळ (रजि.), तवसाळ तांबडवाडी यावर्षी (२५ वे) रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त आदर्श चषक 2024 स्पर्धेचे आयोजन अग्रवाल मैदान, विरार येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेतेपद श्री हसलाई देवी क्रिकेट संघ खालचीवाडी ( वरवेली ) संघाने पटकावले. तर अर्षित इलेव्हन शीर संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी झाले होते. Ideal cup 2024 Tawasal Tambadwadi
सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व विकास कामांसाठी 1997 मध्ये आदर्श नवतरुण मित्र मंडळ (रजि) तवसाळ तांबडवाडी, ता. गुहागर या मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाद्वारे विविध उपक्रम राबवून स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांनी प्रगतीकडे वाटचाल सुरु केली. आज या मंडळाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गुहागर तालुक्यातील मुलनिवासी असलेले मात्र नोकरी उद्योगासाठी मुंबई स्थायिक झालेल्या तरुणांसाठी क्रीकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. Ideal cup 2024 Tawasal Tambadwadi
गुहागर तालुक्यातील वरवेली, शीर, कौंढर काळसुर, तवसाळ बाबरवाडी व तांबडवाडी, कर्दे, हेदवी, पालपेणे, काजुर्ली, नरवण, भातगांव, पाभरे, अंजनवेल, कोतळूक, या गावांमधील मुंबईत नोकरी उद्योगासाठी स्थायिक झालेले ग्रामस्थ स्पर्धेत सहभागी झाले होते. सलग तीन वर्ष आदर्श चषक चा विजयी संघ श्री हसलाई देवी क्रिकेट संघ खालचीवाडी, वरवेली यांना चषक व रोख रक्कम देण्यात आली. तर उपविजेता अर्षित इलेव्हन शीर खालची वाडी हा संघ गेली 2 वर्ष यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र साखळी सामन्यात त्याला पराभुत व्हावे लागत होते. २ वर्षांनंतर उविजेतेपदाकडे वाटचाल केली आहे. Ideal cup 2024 Tawasal Tambadwadi
आदर्श चषक – २०२४ चा मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज वरवेलीतील शशांक शिंदे याला गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट गोलंदाज शिरचा रोहन गिजे ठरला. तसेच सामाना फिरवणारी कामगिरी करणाऱ्या वरवेलीतील सुयोग आगरेला श्री रमेश वाघे तांबडवाडी कडून स्मार्ट वॉच देण्यात आले. सर्व सामान्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब मिळविणाऱ्या शशांक शिंदेला संदेश दादा काताळकर यांचेकडून टिशर्ट भेट देण्यात आला. या स्पर्धेचे YouTube live लाईव्ह करून लोकांपर्यंत हा क्रिकेटचा थरार पोहविण्याचे आयोजन केले होते. संदिप जोशी तवसाळ बाबरवाडी यांनी लाईट ची व्यवस्था केली. नितेश कावणकर यांनी सुंदर फोटोग्राफी केली तसेच स्पर्धेचे सूत्रसंचालन विनोद वाघे यांनी केले. Ideal cup 2024 Tawasal Tambadwadi
यावेळी आदर्श नवतरुण मित्र मंडळ, तवसाळ तांबडवाडीचे अध्यक्ष, चंद्रकांत निवाते, सेक्रेटरी, प्रकाश कुळये, खजिनदार, निलेश कुळये, अजय वाघे, सुरेश निवाते, प्रकाश कुळये, संदीप वाघे, संजय वाघे, विनोद वाघे, सुरेश कुळये, सचिन कुळये, अंकुश निवाते, अरविंद वाघे, रमेश वाघे, दिपक कुळये, अनंत गिजये, शंकर वाघे, समोर वेलुंडे, विजय वाघे, विलास वाघे, मंगेश कुळये, दिपक निवाते, मंगेश वाघे तसेच आदर्श नवतरुण मंडळाचे सर्व सदस्य व महिला मंडळ सुप्रिया वाघे, वंदना निवाते, प्रज्ञा कुळये, सुवर्णा निवाते, साक्षी वाघे, श्रुती वाघे, संपदा वाघे, पुर्वा कुळये, शर्वरी कुळये उपस्थित होते. आदर्श नवतरुण मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. Ideal cup 2024 Tawasal Tambadwadi