• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात चार शिक्षक ठरले आदर्श

by Mayuresh Patnakar
October 6, 2026
in Guhagar
218 2
0
Honouring Teachers from Guhagar Taluka
428
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उल्लेखनीय कार्याचा पंचायत समितीमार्फत होणार गौरव

गुहागर, ता. 06 : समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने पंचायत समिती गुहागरच्या शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२६-२७ च्या तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एकूण २९ शिक्षकांची नामांकने प्राप्त झाली होती. त्यातून मूल्यांकन प्रक्रियेद्वारे चार शिक्षकांची तालुकास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. Honouring Teachers from Guhagar Taluka

पंचायत समिती गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांच्या संकल्पनेतून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षकांनी समाज व विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि विशेष कार्याला सन्मान मिळावा, तसेच इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. Honouring Teachers from Guhagar Taluka

केंद्रस्तरीय व प्रभागस्तरीय मूल्यांकन अहवालाच्या आधारे तालुकास्तरावर शिक्षकांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर चार शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये गुहागर प्रभागातून अमोल भैरवनाथ धुमाळ (जि.प. जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १), अडूर प्रभागातून सुनील शंकर वाघे (जि.प. शाळा उमराठ नं. १), चिखली प्रभागातून किरण रामचंद्र सूर्यवंशी (जि.प. शाळा कौंढर काळसूर गुरववाडी) आणि आबलोली प्रभागातून सतीश नंदकुमार विचारे (जि.प. शाळा कोळवली भुवडवाडी) यांची तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. Honouring Teachers from Guhagar Taluka

“आदर्श शिक्षक घडला तर आदर्श विद्यार्थी घडतात आणि आदर्श विद्यार्थी घडले तर आदर्श समाजाची निर्मिती होते,” या विचारातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षकांच्या योगदानाला समाजमान्यता मिळण्याबरोबरच त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांना प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पंचायत समिती गुहागरच्या शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या निकालामुळे निवड झालेल्या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Honouring Teachers from Guhagar Taluka

Tags: GuhagarGuhagar NewsHonouring Teachers from Guhagar TalukaLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share171SendTweet107
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.