सभापती प्रणव पोळेकर; उद्योगमंत्री, पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील भातगाव पंचक्रोशीत किंवा पडवे – तवसाळ, पडवे – तांबड – बाबर किंवा चिंद्रावळे या भागात पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदयजी सामतांच्या माध्यमातून एमआयडीसी येणार आणि पाच हजार ते सहा हजार तरुणांना रोजगार मिळणार असे स्पष्ट प्रतिपादन गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी केले. MIDC to come up in Guhagar taluka
भातगाव – गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, पंचायत समिती सदस्या रेणुका आग्रे, विजय मोहिते, सागर काजरोळकर, विशाल गोताड, दीपक जाधव, आशिष डिंगणकर, अनंत डिंगणकर यांच्यासह गावकरी, मानकरी, जागा मालक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. MIDC to come up in Guhagar taluka

यावेळी बोलताना सभापती प्रणव पोळेकर म्हणाले की, तलावाच्या कामासाठी बुजुर्ग मंडळी जे या ठिकाणी आहेत त्यांचा हात या कामी लागला त्यांच्या हातातून गणपती विसर्जन तलाव साकारण्यात आलेला आहे. आपल्याला तो पाहायला मिळतोय आम्ही ज्या वेळेला पंचायत समितीला सदस्य पदी आमची निवड झाली. त्याच वेळी आमचं एकच टार्गेट होतं की, महिला वर्गांसाठी आणि तरुण वर्गासाठी अर्थकारणाच्या दृष्टीने रोजगार उपलब्ध झालाच पाहिजे. आम्ही ज्या ज्या वेळी गावात जातो त्या त्या वेळी पहातो तर 80 % लोक मुंबईमध्ये राहतात आणि वीस टक्केच म्हातारे आणि महिला वर्ग हे गावी राहतात. खास करून गुहागर तालुक्यामध्ये हे चित्र जास्तच पाहायला मिळते. आणि म्हणूनच येणाऱ्या पिढीसाठी कशा पद्धतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील. यासाठी उद्योग मंत्री, पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे एमआयडीसी संदर्भात आम्ही मागणी केली आहे. या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. यासाठी तीन ठिकाणच्या जागा आयडेंटिफाय झालेला आहेत. मात्र त्या जागेची नावे मी सांगत नाही. कारण काय होतं की, जागांची नावे सांगितले की, त्या ठिकाणी दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. MIDC to come up in Guhagar taluka

एखादी एमआयडीसी आणायची म्हटले तर त्या ठिकाणी दलाल मोठ्या प्रमाणात येतात आणि संबंधित शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे त्या जागांची ही आयडेंटिफाय झालेय भविष्यात या भातगाव पंचक्रोशीत किंवा पडवे – तवसाळ, पडवे – तांबट- बाबर किंवा चिंद्रावळे या भागातील तरुणांना मुंबईच्या ठिकाणी नोकरीला जावं लागणार नाही अशा पद्धतीची आमची रणनीती आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय. गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो हे यश आम्हाला लवकरच येवो. साधारणता पाच ते सात हजार जॉब जनरेटर होतील. अशा पद्धतीची एमआयडीसी कदाचित आपल्या भागात लवकरच येईल आणि त्याची घोषणा देखील पालकमंत्री काही दिवसात करतील. अशा पद्धतीचं आमचं व्हिजन या गुहागर तालुक्यासाठी आहे. असे स्पष्ट मत गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डिंगणकर यांनी केले तर अनंत गावडे गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले. MIDC to come up in Guhagar taluka
