रत्नागिरी, ता. 15 : येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विद्यान वरिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व परीक्षा विभागाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम साजरा झाला. प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिस्तपत्रक देऊन गौरविण्यात आले. Honors Program at Dev, Ghaisas, Keer College
विशेष रोख रक्कम पारितोषिकांमध्ये विनय वसंत परांजपे यांच्याकडून दिले जाणारे तृतीय वर्ष कला शाखेत मराठी विषयात प्रथम येणारा विद्यार्थी प्रा. एन. वाय. कुलकर्णी पारितोषिक २०२४ मध्ये श्रुतिका विलास पाडावे व अर्थशास्त्र विषयात प्रथम येणारा विद्यार्थी प्रा. शालिनी मेनन पारितोषिक यावर्षी वैष्णवी सत्यवान नापणेकर यांना देण्यात आले. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत अकाउंट्स विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रा. हरिप्रसाद शिवलाल लड्डा पारितोषिक पूजा इंद्रमल परमार हिला प्राप्त झाला. Honors Program at Dev, Ghaisas, Keer College
प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांनाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य शाखेच्या प्रमुख प्रा. राखी साळगावकर, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. वैभव घाणेकर, प्राध्यापक व शाखाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक परीक्षा विभागप्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वैभव घाणेकर यांनी केले. प्रा. वैभव कीर यांनी आभार मानले. Honors Program at Dev, Ghaisas, Keer College