संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे या शाळेला शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात मिशन आपुलकी व एकजूट या उपक्रमांतर्गत शाळेला भरघोस देणगीही मिळाली आहे. Help from villagers to Aware school
यामध्ये श्री. शिवराम जानू शितप यांजकडून ६०००/- रुपये त्यामध्ये एक लाकडी खुर्ची व तीन प्लास्टिक खुर्च्या देण्यात आल्या, श्री. सुनील मारुती गुरव यांजकडून शाळेचा बोर्ड तयार करण्यासाठी ३०००/- रुपये देणगी मिळाली, तसेच श्री. सुरेश गोताड, श्री. यश शितप, श्री. अनंत शितप, श्री. चंद्रकांत शितप, सौ. शालिनी शितप, यांजकडून प्रत्येकी एक राष्ट्रीय नेत्यांचा फोटो देण्यात आला. तसेच श्रीमती. सुप्रिया शांताराम शितप यांजकडून एक पंखा, श्री. प्रकाश पांडुरंग शितप यांजकडून चार ट्यूबलाईट देण्यात आल्या. तर श्रीमती. सुजाता शांताराम शितप यांजकडून मुलांना बसण्यासाठी चटई देण्यात आल्या. श्री. यशवंत गोताड यांजकडून मुलांसाठी दोन चप्पल स्टॅन्ड आणि श्री.अशोक जाधव व सौ.अपर्णा जाधव ( अंगणवाडी सेविका ) यांच्याकडून 2 डस्टबिन शाळेसाठी देण्यात आले. रॉयल इलेव्हन क्रिकेट संघ आवरे यांच्यातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, तसेच नवतरुण मित्र मंडळ गुरववाडी मुंबई यांच्यातर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला अर्धा डझन वह्या वाटण्यात आल्या. Help from villagers to Aware school
या सर्व देणगीदारांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षां सौ. सुचिता सुनील भरणकर व सर्व सदस्य त्याचप्रमाणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संस्कृती वैभव ढवळ आणि शिक्षिका श्रीम.स्वाती सुर्वे यांनी आभार मानले, तसेच शाळेला देणगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तसेच शाळेला वेळोवेळी मदत करणाऱ्या गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री. यशवंत शितप व श्री. रामचंद्र गुरव, श्री सखाराम गुरव, श्री गणपत शितप, सरपंच श्री.प्रकाश काताळकर, श्री.यशवंत गोताड, श्री.सुरेश गोताड, श्री.कृष्णा खळे, श्री.सुनील भरणकर, श्री. मंगेश भरणकर, श्री.निलेश घुमे यांचेही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आभार मानण्यात आले. Help from villagers to Aware school