मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
मुंबई, ता. 25 : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर आणि वाशीमसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वाऱ्यांसह मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज आहे. Heavy rain warning
गुजरात आणि राजस्थानातील काही भागातून मान्सून माघारी फिरल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमधील देखील काही भागातून मान्सून माघारी परतला. मान्सून रेषा फिरोजपूर, चुरु, अजमेर, माऊंट अबू, सुरेंद्रनगर आणि जुनागढमधून जात आहे . महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि गोव्यात 26 सप्टेंबरपर्यंत काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर, परिसरासह पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. Heavy rain warning