येत्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी अलर्ट
गुहागर. ता. 22 : ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, घटमाथ्यावरही मुसळधार पाऊस असेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Heavy rain warning from Met department


तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, बुलढाणा भागात मुसळधार पावसाचा इशारा येत्या 24 तासात देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. पश्चिम महाराष्ट्रात उद्या म्हणजे 23 ऑक्टोबरलाही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागात तुरळक ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस राहील असं म्हटलं आहे. Heavy rain warning from Met department