रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सहा जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी
मुंबई, ता. 11 : राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. १२ ते १४ जुलै असे तीन दिवस अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. Heavy rain is likely
घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, वरील भागात ११ जुलैसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी आरएमसीने पुढील चार दिवस १४ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. पालघरमध्ये १२ आणि १३ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान ३२ ते २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. Heavy rain is likely
अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ साठी १२ ते १४ जुलै दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आरएमसीने वर्तवली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवा आणि विमान सेवा विस्कळीत झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. Heavy rain is likely