संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली येथील पोलिस चौकी जवळील डॉ.गौरव निवाते यांच्या सुश्रृत क्लिनिकमध्ये उद्या शुक्रवार दि. २२ मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Health check up camp at Aabloli
हे शिबिर अपरान्त मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल चिपळूण आणि सुश्रृत क्लिनिक आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे. यावेळी हाडांचे सर्व आजार, हाडांचा ठिसूळपणा यावर मोफत तपासणी करण्यात येणार असून तज्ञ डॉक्टरांतर्फे तपासण्यात येणार आहे. तसेच रुग्णांना अधिक उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय), निवृत्त सैनिक योजना, (इसीएचएस), पोलिस कर्मचारी कुटुंब योजना आदी शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. सुश्रृत क्लिनिकमध्ये इसीजी, डिजिटल एक्सरे, पॅथोलॉजी लॅब, एन्डोस्कोपी जनरल सर्जरी, फिजिओथेरपी या सुविधा उपलब्ध आहेत. Health check up camp at Aabloli
तरी आबलोली पंचक्रोशीतील जनतेने बहूसंख्येने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन अपरांत मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल चिपळूणचे अस्थिविकार चिकित्सक व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.श्रीश भास्करवार, सुश्रृत क्लिनिक आबलोलीचे एम.एस.जनरल सर्जन डॉ.गौरव तुकाराम निवाते, बी.ए.एम.एस.डॉ.स्नेहल गौरव निवाते, बी.एच.एम.एस. सीजीओ, सीसीएच.डॉ.तेज श्री.तुकाराम निवाते, सामाजिक कार्यकर्ते श्री.विनायक अनंत गुरव, सुरज पेवेकर यांनी केले असून नाव नोंदणीसाठी डॉ.गौरव तुकाराम निवाते मो.नं.९४०३३६३३२१, डॉ.श्रीश भास्करवार मो.नं.८७६७१०१२७१, ७८७५३५४४६४, १०२१३७८५६२ यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे. Health check up camp at Aabloli