महिलांसाठी हळदीकुंक कार्यक्रमाचेही आयोजन
गुहागर, ता. 08 : शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या चोरगे सभागृहात रविवार दि. 9 फेब्रुवारीला महिला पुरुषांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ घेण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील महिला, पुरुष, युवक – युवतींनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Health camp at Gyanrashmi Library
फीट फॉरएव्हेर या संस्थेतर्फे वजन कमी करणे, वाढविणे, महिलांच्या सर्व समस्या, हृदयविकास, अर्धांगवायू, त्वचेच्या समस्या व रोग, लहान मुलांचे आरोग्य, सांधे व हाडांची मजबुती कशी टिकवता येते. अशा शरिराच्या सर्व समस्यांवर मार्गदर्शन केले जाते. निरामय व निरोगी आयुष्याचा मंत्रच अशा शिबिरांमधुन सांगितला जातो. व्हिडिओ, फोटो, अन्य प्रेझेंटशनद्वारे जटील मुद्दे सोप्या भाषेत समजावून सांगितले जाते. Health camp at Gyanrashmi Library


गुहागर शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयात याच पध्दतीचे शिबिर रविवार 9 फेब्रुवारीला दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार आहे. या शिबीरामध्ये फिटनेच कोच सौ. निलिमा शिलवंत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिबीरानंतर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. तरी तालुकावासीयांनी या शिबीराचा व हळदीकुंकु समारंभाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सौ. सिध्दी आरेकर, सौ. सोनाली घाडे व सौ. विणा भोसले यांनी केले आहे. Health camp at Gyanrashmi Library