गुहागर, ता. 30 : पंचायत समिती सभागृह गुहागर येथे दरवर्षी प्रमाणे मंगळवार दि. 03 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व दिव्यांगानी वेळेत उपस्थित रहावे. Handicapped Assistance Day


तसेच जे दिव्यांग स्वतःचा व्यवसाय करीत असून काही वस्तू बनवत असतील तर त्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. तरी ज्यांना स्टॉल लावायचे असतील त्यांनी लगेच 9423876428 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच ज्या दिव्यांगाना व्हीलचेअर, मानेचे पट्टे, कंबरेचे पट्टे, हवे असतील त्यांनी अपंग प्रमाणपत्र, आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत घेऊन यावे. तरी तालुक्यातील सर्व दिव्यांगानी वेळेत उपस्थित रहावे. Handicapped Assistance Day