रत्नागिरी, ता. 11 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत भारत शिक्षण मंडळ देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजने कांस्यपदक प्राप्त केले. दोन जणांची कोकण झोन संघात निवड झाली आहे. Handball Tournament by University of Mumbai
ही स्पर्धा लांजा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला शाखेतील राज रमेश वाडेकर व प्रथम वर्ष कला शाखेतील प्रतीक रमेश वाडेकर या दोघांची कोकण झोन संघात निवड झाली आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल महाविद्यालयातर्फे आणि भारत शिक्षण मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. Handball Tournament by University of Mumbai