• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात गुरुपौर्णिमा संपन्न

by Mayuresh Patnakar
July 13, 2022
in Guhagar
19 0
0
Gurupournima program at KDB College

Guhagar-kdb-college

37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : एज्युकेशन सोसायटीचे, खरे ढेरे भोसले महाविद्यालय (Khare Dhere Bhosle College) येथे माहिती तंत्रज्ञान विभागमध्ये (BSC IT) गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान विभागाबरोबर संगणकशास्त्राचे विद्यार्थ्यीदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. Gurupournima program at KDB College

गुहागर तालुक्यातील मुंबई विद्यापीठाचे एकमेव मान्यताप्राप्त ( माहिती तंत्रज्ञान विभाग ) महाविद्यालय म्हणून ओळख आहे. खरे-ढेरे भोसले (KDB) महाविद्यालय आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच पारंपरिक संस्कृतीची जोपासनेची ओळख करून देणारे आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर सांस्कृतिक शिक्षण तसेच गुरू आणि शिष्य यांचे नाते आजही परंपरा जोपासणारे आहे . शिक्षक हा विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांचे भविष्य उज्वल करतो. त्याला एक चांगला नागरिक म्हणून तयार करतो. ते ज्ञान घेऊन शिष्य आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून यशस्वी झाला. म्हणजेच गुरुला त्याची गुरू दक्षिणा मिळाली. Gurupournima program at KDB College

गेली अनेक वर्षे ह्या महाविद्यालयाचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जनजागृती घडवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत आणि कर्मचारी वर्ग नेहमीच प्रयत्नशील असतात. गुहागर तालुक्याचा ग्रामीण भाग आणि तेथील जीवनशैली यांचा अभ्यास करून आपल्या सहकार्यांना वेळोवेळी योग्य मार्गदशन हे प्रभारी प्राचार्य डॉ . अनिल सावंत करताना दिसतात. कला, वाणिज्य, विज्ञान यासारख्या शाखा आणि माहिती तंत्रज्ञान ( IT) व्यावसायिक शाखा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी तसेच कॅम्पस इंटरव्हूय विविध प्रकारची प्रशिक्षणे, करीयर गाईडन्सची मार्गदर्शनपर शिबीरे, NSS कॅम्प, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन महाविद्यालयामार्फत वेळोवेळी केले जाते. Gurupournima program at KDB College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGurupournima program at KDB CollegeLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.