गुहागर, ता. 13 : एज्युकेशन सोसायटीचे, खरे ढेरे भोसले महाविद्यालय (Khare Dhere Bhosle College) येथे माहिती तंत्रज्ञान विभागमध्ये (BSC IT) गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान विभागाबरोबर संगणकशास्त्राचे विद्यार्थ्यीदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. Gurupournima program at KDB College
गुहागर तालुक्यातील मुंबई विद्यापीठाचे एकमेव मान्यताप्राप्त ( माहिती तंत्रज्ञान विभाग ) महाविद्यालय म्हणून ओळख आहे. खरे-ढेरे भोसले (KDB) महाविद्यालय आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच पारंपरिक संस्कृतीची जोपासनेची ओळख करून देणारे आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर सांस्कृतिक शिक्षण तसेच गुरू आणि शिष्य यांचे नाते आजही परंपरा जोपासणारे आहे . शिक्षक हा विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांचे भविष्य उज्वल करतो. त्याला एक चांगला नागरिक म्हणून तयार करतो. ते ज्ञान घेऊन शिष्य आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून यशस्वी झाला. म्हणजेच गुरुला त्याची गुरू दक्षिणा मिळाली. Gurupournima program at KDB College
गेली अनेक वर्षे ह्या महाविद्यालयाचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जनजागृती घडवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत आणि कर्मचारी वर्ग नेहमीच प्रयत्नशील असतात. गुहागर तालुक्याचा ग्रामीण भाग आणि तेथील जीवनशैली यांचा अभ्यास करून आपल्या सहकार्यांना वेळोवेळी योग्य मार्गदशन हे प्रभारी प्राचार्य डॉ . अनिल सावंत करताना दिसतात. कला, वाणिज्य, विज्ञान यासारख्या शाखा आणि माहिती तंत्रज्ञान ( IT) व्यावसायिक शाखा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी तसेच कॅम्पस इंटरव्हूय विविध प्रकारची प्रशिक्षणे, करीयर गाईडन्सची मार्गदर्शनपर शिबीरे, NSS कॅम्प, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन महाविद्यालयामार्फत वेळोवेळी केले जाते. Gurupournima program at KDB College