गुहागर, ता. 30 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2025 रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धां दि. 22 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत वरचापाट मोहल्ला येथे भरविण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत आलीना इलेव्हन, आबलोली संघ प्रथम तर सागर पुत्र, असगोली संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. Gulzar Cricket Club Tournament
प्रथम आलीना इलेव्हन, आबलोली संघाला रोख रक्कम 25000/- व आकर्षक चषक व द्वितीय सागर पुत्र, असगोली संघाला रोख रक्कम 15000/- व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. मालिकावीर आबलोली संघाचा सुशांत (भाई) कदम, सामनावीर आबलोली संघाचा अमित पवार, उत्कृष्ट फलंदाज असगोली संघाचा रुतीक तिमसेकर, उत्कृष्ट गोलंदाज आबलोली संघाचा अमन कदम, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असगोली संघाचा रुतीक तिमसेकर, उगवता तारा पिंपळादेवी संघाचा पिनाक साखरकर, टनिंग पॉइन्ट आबलोली संघाचा जयश कदम, उत्कृष्ट यष्टिरक्षक उन्हवरे संघाचा अरबाज खोत, षटकार किंग आबलोली संघाचा सुशांत (भाई) कदम तसेच प्रत्येक दिवसाचा प्लेयर ऑफ द डे पहिला दिवस आबलोली संघाचा सुशांत (भाई) कदम, दुसरा दिवस दाभोळ संघाचा रुषीकेश बरे, तिसरा दिवस पिंपळादेवी संघाचा पिनाक साखरकर, चौथा दिवस उन्हवरे संघाचा राशीद खोत, पाचवा दिवस धोपावे संघाचा सौरभ पवार यांची निवड करण्यात आली. Gulzar Cricket Club Tournament
या स्पर्धेसाठी शाहाजान माहीमकर, इफ्तिकार भाटकर, वासीम झोंबडकर, नवाज भाटकर, तोफिक भाटकर, इमरान माहिमकर, फैयज माहिमकर, शादाब माहिमकर, फुरकान माहिमकर, इरफान माहिमकर, एजाज माहिमकर, आरिफ भाटकर, इकबाल होडेकर, कय्युम भाटकर, मुजफ्फर तुरुक, इमरान झोबंडकर, चांदमिया बागकर, जुबेर माहिमकर यांचे सहकार्य लाभले. Gulzar Cricket Club Tournament