तहसिल व पंचायत समितीचा उपक्रम, बचतगट, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन
गुहागर, ता. 26 : गुहागर तहसिल कार्यालय व पंचायत समितीमार्फत मतदार जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम पाटपन्हाळे ग्रा.पं.च्या छत्रपती शिवाजी
महाराज सभागृहात घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी महिला बचतगट, अंगणवाडी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. Guidance on Voter Awareness
भारत निवडणूक आयोगाच्या आवाहनानंतर वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात मतदार जनजागृती कार्यक्रम, उपक्रम शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात येत आहेत. तसेच माता-पालक बैठक, गृह भेटी, प्रभातफेरी यांच्यामार्फत गाव-वाडीवार व घरोघरी फिरुन भेटीगाठी घेऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत. तसेच उत्तम रांगोळ्या काढून त्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. Guidance on Voter Awareness
गुहागर तहसिलदार परीक्षित पाटील, गुहागर पंचायत समिती महिला बालकल्याण समिती प्रकल्प अधिकारी प्रमोद केळस्कर यांच्यासह अन्य अधिकारी संबंधित ठिकाणी भेटी देऊन मतदार जनजागृती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पाटपन्हाळेत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य सेविका, मंडल अधिकारी गवळी, २२६ अंगणवाडी कर्मचारी, महिला बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. Guidance on Voter Awareness