• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

“नर्सिंग आणि स्त्रियांचे आरोग्य“ विषयावर मार्गदर्शन

by Ganesh Dhanawade
October 13, 2023
in Guhagar
94 1
0
Guidance on “Nursing and Women's Health”
184
SHARES
527
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रिगल कॉलेज शृंगारतळी; प्रमुख वक्ते- डॉ. सचिन ओक

गुहागर, ता. 13 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये दि.12-10-2023 रोजी नर्सिंग आणि स्त्रियांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून शृंगारतळी येथील प्रोलाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा मा.श्री.डॉ. सचिन ओक (MS,MBBS) हे उपस्थित होते. Guidance on “Nursing and Women’s Health”

Guidance on “Nursing and Women's Health”

या व्याख्यानामध्ये सर्व प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळी च्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रमुख प्रा.शैलेश घाणेकर यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. श्री.डॉ.सचिन ओक यांनी सांगितले की, विद्यार्थिनिंनी नेहमी सुयोग्य दिनचर्येतून निरोगी शैली आत्मसात करावी. त्यात वेळेवर जेवणे, पुरेशी झोप, प्रथिनयुक्त आहार, शारीरिक स्वच्छता याचे महत्व पटवून दिले. नर्सिंग केअर या सदरामध्ये नर्सेसना नर्सिंग क्षेत्रासंर्भात नेहमी मुलभूत ज्ञानाच्या माहितीबरोबरच गरूकता, चपळपणा, समयसूचकता, प्रामाणिकपणा या गोष्टी असणे आवश्यक आहे. या गोष्टींच्या सहाय्याने नर्स जगामध्ये कुठेही काम करू शकते. चांगल्या नर्सस मुळेच हॉस्पिटलचा दर्जा उंचावतो असेही ते म्हणाले . रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये नर्सिंग हा कोर्स असणे हे भाग्याचे आहे. या संधीचा लाभ सर्व विद्यार्थीनिंनी घ्यावे असे सांगितले व रिगल कॉलेजला नेहमी मी सहकार्य करेन, अशी ग्वाही दिली. Guidance on “Nursing and Women’s Health”

त्यानंतर रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन विद्यार्थिनिंना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. सचिन ओक यांचे आभार मानले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.संजयराव शिर्के सर,संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. Guidance on “Nursing and Women’s Health”

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuidance on “Nursing and Women's Health”Latest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet46
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.